महामार्गावरील हॉटेलमध्ये सर्रास दारू विक्री

File photo...

चिंबळी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळंदी फाटा ते मोशी टोलनाक्‍या इंद्रायणी नदी पर्यंत विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल उभारण्यात आले असून यामध्ये सर्रासपणे अवैध दारू विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरीदेखेल पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खेड तालुक्‍यात गेल्या पधंरा वर्षांपासून औद्योगिक क्षेत्र आल्याने पुणे नाशिक महामार्गावरील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील विविध गावामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करून बैकायदेशीरपणे अवैध दारूविक्रीचा धंदा सुरू असल्याने या भागातील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेले असल्याने अनेकांचे संसार उद्‌ध्ववस्त झाले असून काहीचे प्राण ही गेले आहे, तरी देखील पोलीस यंत्रणा सुस्त कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)