महामार्गालगत पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा

चिंबळी-पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरूळी, चिंबळी, मोई फाट्या पर्यंत अवजड वाहने व अवैध वाहतूक करणारे तीनचाकी रिक्षा चालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.
रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करण्यात येणारी वाहने हटविण्यात यावीत, या रस्त्यावरून सतत जडमालवाहू गाड्यांची वर्दळ असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा मालवाहू अवजड वाहने उभी केली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ही बेकायदा पार्किंग अवैध वाहतूक करणारे हटविण्यात गरज निर्माण झाली आहे. यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित केला आहे. खेड तालुक्‍यात गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रत्स्यावर जडमालवाहू गाड्यांची वर्दळ सतत वाढली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने अवैधरीत्या भर रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने आळंदीफाटा, कुरूळी, चिंबळीफाटा, मोई व इंद्रायणी नदीच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. चाकण परिसरातील आळंदीफाटा, निघोजे, कुरूळी, चिंबळी, मोई परिसरात अनेक लहान मोठ्या कंपन्या व गोदामे उभारली आहेत. अशा कंपन्यात कच्चा माल घेऊन येणारी अनेक वाहने रत्स्यावर उभी केली जातात. काही वाहन चालकांना तर आत कंपनीत जागा नाही असे सांगून दोन-तीन दिवस बाहेर ठेवले जाते. अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा वेळी त्यांची वाहने ही कंटेनर किंवा त्याहीपेक्षा मोठी अवजड असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी वाढतच आहे. त्यामुळे रस्ता मोठा असला तरी वाहतुकीस अपुरा ठरत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)