महामार्गाचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे

अन्यथा आंदोलन : प्रांताधिका-यांना निवेदन

पाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा बुधवार (दि.30) मे रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांना दिला आहे.

याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 222 (61) चे काम बंद पडल्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला. गेल्या दोन वर्षापासून महामार्गाची धीम्या गतीने काम सुरू आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खोदून खड्डे करून ठेवले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे.

गेल्या काही महिन्यापासून तर काम पुर्णपणे बंद असल्याने अपघातांची मालिकाच या महामार्गावर सुरू आहे. दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेकांना यामध्ये आपला जिव गमवावा लागला. तर शेकडो प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे. पाथर्डी शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप समोर, विजय हनुुमान (दक्षिण मुखी) मंदिर मागे, स्मशानभूमी पुल आदी ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
यामुळेही छोटे – मोठे अपघात नेहमी या मार्गावर घडत आहेत. बंद पडलेले महामार्गाचे काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

यासंदर्भातील नगरसेवक प्रविण राजगुरु, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, विधी सेवा समितीचे सदस्य नितीन गटाणी, बबन बुचकुल, गणेश खाडे, अजित कंठाळी, चंद्रकांत काकडे, आण्णा पालवे यांच्या उपस्थितीत प्रातांधिकारी विक्रमसिंह बांदल यांना निवेदन देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)