महामार्गांलगत आता चिंच, बांबू आणि आमराई

वनमहोत्सवात लागवड : वन विभाग आढावा बैठकीत निर्णय

पुणे – रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड केल्याने मोठे अपघात रोखण्यास मोठी मदत मिळते. शिवाय स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागडीमुळे पर्यावरणाचा समतोल तर राखला जातोच, त्याशिवाय रोजगार निर्मितीतदेखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. याची दखल घेत यंदा रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सलग चिंचवन, बांबूवन, आमराई वन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनमहोत्सवांतर्गत 2019 या वर्षासाठी महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यासंबंधी पुणे विभागाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी, तसेच वने, सामाजिक वनीकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या.

खारगे म्हणाले, “अनेकदा रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांमुळे मोठ्या दुर्घटना टळल्याचे सिद्ध झाले आहे. सुशोभिकरणासोबतच झाडांमुळे जमिनीतील पाणी रोखले जाऊन, त्यामुळे तापमान वाढीचा कमीत कमी परिणाम रस्त्यांवर होतो. विशेषत: रस्त्यांच्या देखभालीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळेच रस्त्यांच्या कडेला वृक्षलागवड करणे उपयुक्त ठरते. बांबू, चिंच, तुतीच्या वृक्ष लागवडीने शेती उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय यामुळे रोजगारही उपलब्ध होतो. तसेच रस्त्याच्या लगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यातून लाभ मिळेल.’

रस्त्यांव्यतिरिक्‍त शाळा, दवाखाने, कार्यालये याठिकाणी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. नद्यांच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास नद्यांच्या पुनरुज्जीवनास निश्‍चितच मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)