महामानवाला अभिवादन

पिंपरी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांव्दारे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर – शीलवंत, सह आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, संजय भोसले, विशाल कांबळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कामगार नेते गणेश भोसले, सेवानिवृत्त अधिकारी शरद जाधव, वसंत साळवी, अशोक गायकवाड, निवृत्ती आरवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

त्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. एच. ए. कॉलनी येथील डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही महापौर व आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या आशा शेंडगे – धायगुडे, स्वाती उर्फ माई काटे, रोहीत उर्फ आप्पा काटे, सागर आंगोळकर, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते.

भाजपच्या वतीने शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पक्ष कार्यालयातही अभिवादन करण्यात आले. आमदार जगताप यांच्या हस्ते दोन हजार गरजू विद्यार्थांना मोफत वही व पेन वाटप करण्यात आले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, महेश कुलकर्णी, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक बाबू नायर, विनायक गायकवाड, राजू सावंत, अमृत पऱ्हाड, सलीम शिकलगार, शशिकांत कदम, संदीप बेलसरे, चेतन भुजबळ, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते.

चिंचवड, विद्यानगर येथे त्यांच्या प्रतिमेस भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राम पात्रे, रमाई प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संभा गायकवाड आदी उपस्थित होते. अमित गोरखे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा असा मूलमंत्र दिला. त्यांच्यामुळेच आज दलित समाजातील तरुण मुले-मुली शिक्षण घेऊन मोठ-मोठ्या पदावर उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघचालक डॉ. गिरीश आफळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला. तसेच प्रत्येक नगरातून 500 वही व पेन भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक समरसता मंचाच्या वतीने पाणपोईचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी विलास लांडगे, मिलिंद देशपांडे, रवी कळंबकर, रमेश कुंभार, अशोक वाळके, रवि नामदे, बाळासाहेब सुबोध आदी उपस्थित होते.

साई मल्हार सोशल फाउंडेशन
काळेवाडी येथील तापकीर चौक येथे साई मल्हार सोशल फाउंडेशनच्या वतीन नगरसेवक बाबा त्रिभुवन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणा गीते सादर करण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष मल्हारी तापकीर, विमल सन्स उद्योग समूहाचे उमेश शिंदे, ओझोन टेक सोल्युशनचे प्रवीण थिटे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, राजू पवार, अनिल धांडोरे, बाळासाहेब गायकवाड, रवींद्र बामगुडे, संतोष जाधव, अविनाश दाबके, मदन चौधरी, सिजु नायर आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे सचिव विवेक तापकीर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ
चिखली येथील संत रोहिदास महाराज मंदिर महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सूरज पाखरे, दत्ता सोनवणे, अशोक शेवाळे, लखन बाराते आदी उपस्थित होते.

शिवशाही व्यापारी सेना
शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारी सेनेच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुर्णाकृती पुतळ्यास सह संभाजी महाराज लिखीत बुध्दभुषण ग्रंथास शिवशाही व्यापारी सेना प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले व प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, खजिनदार नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, रोहीत विभुत्ते, मारूती म्हस्के, नरसिंग माने, दत्ता गिरी, राज गिरी, गणेश पाडुळे, निलेश भोरे, आशिष वाळके, अमोल तेलंगे, भाग्यश्री म्हस्के, सारीका तामचिकर, शिल्पा मरडेकर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)