महाभियोग प्रस्ताव : मनमोहनसिंग यांची स्वाक्षरी नाही !

नवी दिल्ली – महाभियोग प्रस्तावावर माजी पंतप्रधान व राज्यसभेचे विद्यमान सदस्य मनमोहनसिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यावरून कॉंग्रेस मध्येच या महाभियोग प्रस्तावावर मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या विषयी पत्रकारांनी कपिल सिब्बल यांना विचारले असता ते म्हणाले की या प्रस्तावाविषयी पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही मुद्दामच मनमोहनसिंग यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी घेतलेली नाही. ते माजी पंतप्रधान आहेत.

त्यांच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीला आम्ही यातून मुद्दामच दूर ठेवले आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला असे झालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान माजी कायदा मंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनीही या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महाभियोग हा खूप गंभीर मामला आहे अशी टिप्पणी त्यांनी केली आहे, पण त्यांनी थेटपणे या प्रस्तावाला विरोधही दर्शवलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)