महाभियोग प्रस्तावावर सल्लामसलत सुरू

नवी दिल्ली – भारताच्या सरन्यायाधिशांच्या विरोधात प्रथमच दाखल करण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाबाबत उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी सल्लामसलत सुरू केली आहे. हैदराबादच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती नायडू हे आपला दौरा लवकर आटोपून आज दिल्लीत परतले. कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी सादर केलेला हा प्रस्ताव स्वीकारयचा की नाही याचा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने एकटे नायडू हेच घेणार आहेत.

या संबंधात त्यांनी ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश बी. सुदर्शन रेड्डी, माजी कायदा सचिव बी. के. मल्होत्रा, इत्यादींशी या आधीच चर्चा केली आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी हा महाभियोग प्रस्ताव स्वीकारला नाही तर त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार कॉंग्रेसने या आधीच व्यक्त केला आहे. या प्रस्तावावर 71 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सह्यांची खातरजमा करण्यासाठी हा प्रस्ताव राज्यसभेच्या सचिवालयाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यसभा सचिवांचा अहवाल आल्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही याचा निर्णय उपराष्ट्रपती घेतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)