महाभियोग प्रकरण ; संविधानाचा गळा दाबू नये – कॉंग्रेसची भाजपवर टीका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध विरोधीपक्षाने आणलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, यानंतर विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सरकारने संविधानाचा गळा दाबू नये, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव  उपराष्ट्रपतीकडे सादर केला होता. मात्र आज हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यात रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर टीका केली. तसेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना हा प्रस्ताव फेटाळण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ही लढाई मुळातच लोकशाहीचा अस्वीकार करणे आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी असल्याचेही सुरजेवाला यांनी म्हटले. तसेच जर सर्व उपसभापती यांच्यासमोर सादर करायचे असेल तर संविधान आणि न्यायाधीशांच्या त्रिसदस्यीय समितीचा काही उपयोग नाही तसेच असे निर्णय घेऊन संविधानाचा गळा भाजपने दाबू नये अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. तर दुसरीकडे ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कोणत्या आधारे हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे?असा सवाल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)