महाभियोग प्रकरण ; कपिल सिब्बल यांनी घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर विरोधी पक्ष कॉंग्रेस चांगलाच आक्रमक झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘सरन्यायाधीश मिश्रा जोपर्यंत पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या न्यायालयात पायच ठेवणार नाही,’ अशी घोषणा कपिल सिब्बल यांनी केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी ही घोषणा केली आहे. आजपासून मी दीपक मिश्रा यांच्या न्यायालयात जाणार नाही. जोपर्यंत मिश्रा पदावरून पायउतार होत नाहीत किंवा निवृत्त होत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या न्यायालयात उपस्थित राहणार नाही. आपला हा निर्णय वकिली पेशाशी सुसंगतच असल्याचा दावाही सिब्बल यांनी केला.
‘माझ्यासह आणखी ६३ जणांनीही मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच आजपासून मी न्यायालयात पाय न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)