महाभियोग नोटिसला काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा विरोध

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी महाभियोगाची नोटिस दिली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे ही नोटिस सुपूर्त करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

या प्रकरणी बोलताना खुर्शीद म्हणाले की, ‘लोया यांचे प्रकरण असो अन्यथा दुसरे प्रकरण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिमच असतो. जर सुप्रीम  कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप असेल तर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुभा असते. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राजकारण करणे योग्य होणार नाही.’


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)