‘महाभारत’ साठी मुकेश अंबानी करणार 1000 कोटींची गुंतवणूक

‘बाहुबली’ या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस. एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट ‘महाभारत’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.  महाभारत या चित्रपटाची कथा ही एम. टी. वसुदेवन यांच्या Randamoozham या कादंबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात आमिर खान कृष्णाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मुकेश अंबानी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ नंतर आमिर खान महाभारत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी या चित्रपटामध्ये 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. आमिर खानच्या महत्वाच्या महाभारत चित्रपटामध्ये मुकेश अंबानी हे सह-निर्माता असणार आहेत. या वृत्ताला मुकेश अंबानी किंवा आमिर खान यांनी दुजोरा दिला नाही. पण वॉयकॉम 18 या आपल्या जुन्या कंपनीमार्फत मुकेश अंबानी गुंतवणूक करणार की नव्या कंपनीमार्फत करणार हे लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. पण आमिर खान आणि रजनीकांत एकत्रित मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले तर नक्की सिनेरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)