महाबॅंकेच्या वतीने शेतकरी मेळावा

सोमेश्वरनगर- मुढाळे (ता. बारामती) येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वडगाव निंबाळकर शाखेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बॅंकेच्या विविध योजनांसह कर्ज मंजूरी, परफेड, किसान क्रेडिट कार्ड, एटीएमचा वापर आणि बॅंक व्यवहार आदी विषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. बॅंकेकडुन दिल्या जाणाऱ्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केले. यावेळी महा बॅंकेचे पुणे पूर्व विभागाचे वरिष्ठ प्रबंधक तारेश्वर निमजे, सरपंच शोभा वाबळे, तलाठी बाळासाहेब वनवे, महिबुब सय्यद, सारिका पवार, संतोष शिंदे, शाखा अधिकारी एस. जे. जांभुळकर, प्रबंधक दिपा गवळी व उपशाखा प्रबंधक अमोल सहाटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)