महाबळेश्‍वर येथे दानशूर व्यक्तीकडून मदतीचा ओघ

महाबळेश्‍वरमधील आगीत झोपड्या जळाल्यानंतर संसारोपयोगी साहित्याचे वाटप

महाबळेश्‍वर –  माणसातली माणुसकी जिवंत रहावी व करुणा जागी रहावी या उदात्त हेतूने मुंबईतील शिक्षण महर्षि अजय कौल यांनी सातारा तालुक्‍यातील विविध शाळा व गरजवंतांना गेली 10 वर्षे प्रसिध्दी पासून दूर राहून सतत मदत करीत आहेत. अशीच मदत त्यांनी महाबळेश्‍वरमधील भीषण आगीत जळालेल्या झोपडपट्टीवासियांच्या कुटूंबियांना त्यांचा संसार सावरण्यासाठी संसोरपयोगी साहित्याचे वाटप करुन केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाबळेश्‍वर येथे पर्यटक येतो तो मौजमस्ती मजा करण्यासाठी. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा विसावा मिळवून मौजमजा करीत असताना स्वतःसाठी अमाप पैसा खर्च करताना नेहमीच स्वतःसाठी जगणारे येथे नेहमीच दिसतात.
परंतु, इतरांचे दुःख पाहून चटकन डोळ्यात अश्रू येणारा व त्यांच्यासाठी सर्वोतोपरी मदत उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवणारा हा अवलिया वेगळाच म्हणावा लागेल.

गेली 10 वर्षांहून जास्त काळ ते आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 29 डिसेंबर रोजी अनेक गरजवंतांची गरज भागविण्यासाठी स्वतः भेट देऊन मदत करण्याच्या प्रयत्नात असतात. महाबळेश्‍वर येथील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत पाच कुटूंबियांच्या झोपड्या जळालेल्या समजताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व रोटरीचे क्‍लबचे माजी अध्यक्ष शिरिष गांधी व प्रा. गणेश कोरे यांना झोपडपट्टीवासियांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत प्रत्यक्ष माहिती घेऊन रोटरी, ईनरव्हिल, पत्रकार संघ व विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्र करुन त्यांच्या हस्तेच त्यांनी झोपडपट्टीवासियांना संसारोपयोगी साहित्य, धान्य, गॅस शेगडी, चादर, ब्लॅंकेटसह विविध साहित्याची मदत केली.

मुंबईतील वर्सोवा येथील शाळेचे अजय कौल मुख्याध्यापक व ट्रस्टी आहेत. प्रशांत काशीद, सामाजिक कार्यकर्ते व रोटरीचे माजी अध्यक्ष शिरिष गांधी, गणेश कोरे यांचीही त्यांना नेहमीच साथ असते. या कार्यासाठी राजकीय पक्षाचे प्रतिनिधीदेखील पक्ष बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी एका व्यासपिठावर येताना दिसतात. त्यांच्या या दानशुर, व उदात्त कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)