महाबळेश्‍वर पालिकेचे कर्मचारी संपावर

सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

महाबळेश्‍वर – पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाबळेश्‍वर पालिकेचे कर्मचारी मंगळवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत संप पुकारत पालिकेच्या प्रवेशद्वारात कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी 25 ऑगस्ट 2017 च्या बैठकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार नगर परिषदेमधील 10 मार्च 1993 पूर्वीचे तसेच 2000 पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2018 पूर्वी कायम करावे, अशा विविध मागण्यांवर सरकारने तोंडी व लेखी आश्‍वासने दिली होती. मात्र, लेखी आश्‍वासने दिल्यानंतरही शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याने संघर्ष समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यातील 359 नगरपालिका व नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी नववर्षाची स्वागताची सुरुवात बेमुदत संपापासून केली.

यावेळी आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी निदर्शने व घोषणाबाजी केली. आंदोलनात पालिकेचे विविध विभागाचे 20 अधिकारी व शंभरहुन अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात पालिका कर्मचारी संघटनेचे आबाजी ढोबळे, बबन जाधव, कल्याण हिवरे, अहमद नालबंद, अरुण वायदंडे, शरद म्हस्के, दीपक मोरे, राजेंद्र चोरगे, राजूभाई शेख, विठ्ठल जाधव, सुनील केळगणे आदींसहमोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)