महाबळेश्‍वर तालुक्‍यात मतदार जनजागृती मोहिम

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील मतदारांना होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ई.व्ही.एम मशीन व व्हीव्हीपॅट मशिनबाबत माहिती करुन देण्याच्या उद्देशाने महाबळेश्‍वर तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी मिनल कळसकर यांनी तालुक्‍यातील दुर्गम भागात मतदार जनजागृतीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षात ईव्हीएम मशीन बाबत मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये मशिनच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न चिन्ह उभे केले जात आहेत. परंतू आता नविन तंत्रज्ञान युक्त व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येणार असल्याने यामुळे मतदारांना आपण केलेले मतदान पाहता येणार आहे. त्यामुळे मतदारांच्या शंका दूर होणार आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)