महाबळेश्‍वरातील एटीएममध्ये खडखडाट

महाबळेश्‍वर अर्बनमुळे टळली ग्राहकांची गैरसोय

महाबळेश्वर –
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामात भरात असताना येथील सर्वच एटीएममध्ये स्थानिकांसह पर्यटनास आलेल्या पर्यटकांना खडखडाट अनुभवयास मिळाला मात्र, महाबळेश्वर तालुक्‍याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेली दि महाबळेश्वर अर्बन को ऑप बॅंकेने पर्यटनास आलेल्या पर्यटकांची आर्थिक गैरसोय होऊ नये या हेतूने आपले एटीएम चोवीस तास सुरु ठेवल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय सोडविली.

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वरमध्ये सध्या दिवाळी हंगामानिमित्त सर्वच प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. मात्र बंद असलेल्या व कॅश नसलेल्या एटीएममुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाबळेश्वरमधील राष्ट्रीयकृत बॅंकांच्या एटीएमवर “नो कॅश’ चे बोर्डस लागलेले असतात. ऐन पर्यटन हंगामात तरी बॅंकांनी कॅशची आधीपासूनच तजवीज करणे गरजेचे आहे, मात्र असे होताना दिसत नाही. मुख्य बाजारपेठेसह परिसरात इतर अनेक बॅंकांची एटीएम असून मात्र ऐन हंगामामध्येच अनेक एटीएमवर कॅशच शिल्लक नसल्याने पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली होती.

-Ads-

दिवाळी हंगामात राष्ट्रीयकृत बॅंकांच्या “एटीएम’मधील खडखडाटामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता मात्र, पैशांअभावी पर्यटकांची आर्थिक गैरसोय होऊ नये या हेतूने महाबळेश्वर तालुक्‍याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन को ऑप बॅंकेने आपल्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बॅंकेच्या एटीएममध्ये पैशांची तजवीज ठेवल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला. या एटीएमवर रात्री देखील कॅशची सोय केल्याने पर्यटकांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. याचे पर्यटकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याकामी महाबळेश्वरातील व्यापारी बांधवानी बॅंकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे पैशाअभावी पर्यटकांसह ग्राहकांची होणारी गैरसोय टाळता आली. दि अर्बन को ऑप बॅंकेने काहीच महिन्यांपासून आपली एटीएम सेवा सुरु केली असून हे एटीएम चोवीस तास चालू असते याचा बॅंकेच्या सभासदासह पर्यटकांना फायदा होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)