महाबळेश्‍वरमध्ये होणार घोड्यांचे पासिंग 

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर नगरपालिकेमार्फत महाबळेश्‍वरातील घोडे व्यावसायिकांच्या घोड्यांचे पासिंग होणार आहे. व्यावसायिक घोड्यांना वाहनांप्रमाणे नंबर देऊन परवाना व ओळखपत्र नगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे. घोडे पासिंग करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले घोड्याचे फिटनेस सर्टिफिकेट व आरोग्य दाखला सक्तीचा आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन व थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्‍वरला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्‍वरात पर्वतरांगा खोल दऱ्या वॉटरफॉल पाहिल्यानंतर पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते ते हॉर्स रायडिंग. वेन्ना लेक येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात हॉर्स रायडिंगचा आनंद लुटत असतात. वेन्ना लेक प्रमाणेच बॉम्बे पॉईंट, लॉडविक पॉईंट, पोलो ग्राऊंड येथे हॉर्स रायडिंग होत असते.

गेल्या काही वर्षात हॉर्स रायडिंग करताना झालेल्या अपघातामुळे घोडे व्यवसाय चर्चेचा विषय ठरून अडचणीत सापडला. हॉर्स रायडिंग करताना झालेल्या अपघाताचे प्रमाण अल्प असले तरी घोडे व्यवसाय करताना घोडे व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घोडे व्यवसायावर सुमारे 170 कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. महाबळेश्‍वर येथील सर्व व्यावसायिक घोड्यांची आरोग्य तपासणी पंचायत समिती महाबळेश्‍वर अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक मार्फत करण्यात आली.

डॉक्‍टर एस. डी. बुधे पशुधन विकास अधिकारी यांनी सर्व घोडयांची आरोग्य तपासनी केली. घोड्यांना होणाऱ्या ग्लॅडर्स या आजाराच्या निदानाचे नमुने घेण्यात आले. विविध निकषांवर घोड्यांना आरोग्य दाखले फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी सुमारे दीडशे घोडयाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच सर्व घोडे व्यावसायिकांना एकाच कलरचा टीशर्ट व त्या टी शर्टवर प्रत्येकाचे नाव व सुरक्षिततेसाठी हेल्मेट देण्यात आली आहेत. सर्व व्यावसायिक घोड्यांचे आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून लवकरच घोड्यांची पासिंग होणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)