महाबळेश्‍वरमध्ये रुबेला लसीकरण मोहीम

महाबळेश्वर :लसीकरण मोहिमप्रसंगी एकत्र आलेले विद्यार्थी.

महाबळेश्वर, दि. 5 (प्रतिनिधी) – मिझल व रुबेला यांची एकत्रित लसिकरण मोहिम सध्या सुरु आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या लसीकरण मोहिमेत सुमारे विद्यार्थ्यांचा टप्पा पार केला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान शहरातून एकंदर विद्यार्थ्यांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. व्ही. तडस यांनी दिली.
नऊ महिने पूर्ण असलेल्या अर्भकापासून 14 वर्षे पूर्ण वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थीनींसह प्रत्येक मुलांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी येथील ग्रामिण रुग्णालयातील डॉक्‍टरांनी मोहिम हाती घेतली आहे. आज महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी ते सांगत होते. सदरची मोहिम ही पाच आठवडे सुरु राहणार असून सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या तसेच शाळा बाह्य मुला व मुलींना या लसीकरणाचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.
यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. एन. व्ही. तडस, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. दबडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यवस्थित शाळेतील शिक्षकांना व पालकांना सविस्तर माहिती देऊन या लसीकरणाची माहिती दिली. शाळा व्यवस्थापनेच्यावतीने प्राचार्य के. एन. सरपाले यांनी चांगली तयारी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)