महाबळेश्‍वरमध्ये धुवॉंधार पाऊस

महाबळेश्वराच्या पावसाचे दीडशतक
महाबळेश्वर – महाबळेश्वर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचे प्रमाण पहाता 3807.3 मिमी (150 इंच )म्हणजे बारा फुट पाच इंच पाऊस आज अखेर झाल्याने हा हंगाम धुवॉंवार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी दिवसभरात 29.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जून महिन्याच्या प्रारंभी कमीअधिक बरसणाऱ्या पावसाने जून च्या अखेरीस व जुलै च्या प्रारंभी शहर व परिसरात तुफान हजेरी लावली.त्या नंतर ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी ही पावसाने पुन्हा एकदा शहर व परिसरात हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसराला धुवाधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले .पावसाने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने रात्री शहर व परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वर्षा पर्यटनासाठी ‘वीकेंड’ला आलेल्या पर्यटकांनी अशा मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)