महाबळेश्‍वरमध्येही चिक्‍की विक्री बंद!

शुद्धतेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच विक्री पुन्हा होणार सुरू

पुणे – लोणावळा येथील प्रसिद्ध चिक्‍की व्यावसायिक मगनलाल चिक्‍की यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) महाबळेश्‍वर येथील चिक्‍की व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विक्रीसाठी असणारी चिक्‍की ही शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच ही विक्री सुरू करावी, असे स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणावळा येथील प्रसिद्ध चिक्‍की व्यावसायिकांवर कारवाई करून कारखाने नुकतेच अन्न व औषध विभागाने बंद केले होते. त्यावेळी पदार्थ बनविताना कायद्याने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करण्यात येत नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. चिक्‍की बनविण्याचे कारखाने बंद ठेवण्यात आले होते. त्याचपार्श्‍वभूमीवर आता महाबळेश्‍वरमधील चिक्‍की व्यावसायिकांची बैठक गुरुवारी एफडीएच्या कार्यालयात बोलविण्यात आली होती. यात सहआयुक्त सु. स. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. एखादा पदार्थ तयार करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणार असाल तर चिक्‍की विकू शकता, अन्यथा विक्री बंद करावी असे आदेश त्यांनी दिले.

कुठलाही पदार्थ विक्रीसाठी तयार केल्यावर तो खाण्यासाठी शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र हे घ्यावे लागते. त्यासाठी विविध प्रयोगशाळेत त्या पदार्थाच्या तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. ते घेणे प्रत्येकाला आवश्‍यक आहे. जोपर्यंत हे प्रमाणपत्र घेत नाहीत, तोपर्यंत महाबळेश्‍वरमधील चिक्‍की विक्री बंद करावी, असे आदेश देशमुख यांनी व्यापाऱ्यांना दिले. त्याचबरोबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाबळेश्‍वरमध्ये बैठक घेऊन सूचना देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

बंदी न घालता चिक्‍की विक्री सुरू
लोणावळा येथील कारवाईनंतर संबंधीत मालकांनी तातडीने हालचाली करून पदार्थ हे खाण्यासाठी शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी मिळवले असून पुन्हा चिक्‍की विक्री सुरू करण्यास एफडीएच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून लोणावळ्यातील चिक्‍की विक्री बंद होती. कित्येक वर्षांत पहिल्यादाच अशा प्रकारे कारवाई झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाचे कौतूक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)