महाबळेश्‍वरपेक्षा पुणे, नाशिक थंड

File Pic

मध्य महाराष्ट्र गारठला : पुण्याचा पारा 10 अंशांवर

पुणे – राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला असून मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही शहरे थंडीने गारठली आहेत. रविवारी (दि. 13) राज्यात सर्वाधिक कमी नाशिक येथे 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शहरांमध्ये थंडीचा कडाका कायम राहिल, अशी शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किंचित घट झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविली होती. परंतू, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात ढगाळ वातावरणामुळे ब्रह्मपुरी आणि गोंदिया भागात थंडीचा कडाका जाणवत होता. मागील आठ दिवसांपासून मध्य महाराष्ट्र चांगलाच गारठला असून थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरपेक्षा अहमदनगर, नाशिक आणि पुणे ही शहरे अधिक थंड झाली आहेत. त्याचबरोबर मालेगाव आणि जळगावमध्येही गारठा वाढला आहे.

राज्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडी कमी होत नसल्यामुळे नागरिक घराबाहेर पडताना स्वेटर आणि कानटोपी घालूनच बाहेर पडताना दिसत आहे. रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. पहाटे धुके आणि थंडी यामुळे मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडणारे नागरिकही थोडे उशीराच बाहेर पडत आहेत. पुणे शहरात रविवारी 10.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहरातील थंडी कायम राहणार असून, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

राज्यातील काही प्रमुख शहरातील किमान तापमान
नाशिक 8, ब्रह्मपुरी 8.9, जळगाव 9.4, पुणे 10.2, मालेगाव 10.6, गोंदिया 11.2, सातारा 11.5, वाशिम 12.4, औरंगाबाद 12.8, सांगली 13.1, महाबळेश्‍वर, नागपूर, नांदेड आणि चंद्रपूर 14, अकोला 14.4, बुलढाणा14.5.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)