महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेने घेतला मोकळा श्‍वास

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरमध्ये शुक्रवारी पोलिस उपविभागीय अधिकारी अजित टिके आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. यामुळे हातगाडीवाल्यांची एकच पळापळ सुरू झाली. तासाभरातच दोन चौकासह विविध रस्त्यांची मोकळा श्‍वास घेतला.

महाबळेश्‍वरात चौका-चौकात हातगाड्यांमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत होता. वाहतुकीची कोंडी होत होती. अखेर वाहतुकीची कोंडीतून शहराची सुटका करण्याच्या उद्देशाने आज उपविभागीय अधिकारी अजित टिके, पालिकेचे मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्याधिकारी, पोलिस निरिक्षक यांच्यासह थेट फौजफाटा घेवून कारवाईला प्रारंभ करण्यात आला. प्रथम सुभाष चौकात धडक मोहिम राबवली.

-Ads-

यावेळी बाजारपेठेत भर रस्त्यात उभ्या असणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. अजित टिके यांनी सिंघम स्टाईने कारवाईला सुरूवात केली व पाहता-पाहता बाजारपेठेचे प्रवेशव्दार मोकळे झाले. यानंतर सुभाष चौकातील कारंजाच्या बाजुने लागलेल्या सर्व हातगाडयांचे अतिक्रमण हटवले. सुभाष चौकात हातगाडीमुक्‍त झाल्यानंतर सर्वजण महादेव मंदीर मार्गे गणेश पेठेत गेले गणेश पेठेचा रस्ता अरूंद आहे. या ठिकाणी एकाच बाजुला कार पार्किंग केले जाते. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना टिके यांनी दिल्या. तसेच विविध रस्ते आणि अतिक्रमण व पार्किंग यांचा आढावा घेत पालिस आणि पालिका प्रशासनाला सुचना केल्या. तसेच छ शिवाजी चौक, बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही बडगा उगारण्यात आला. मस्जिदरोडवर एका गणेश मंडळाने बेकादा टपरी उभी करून त्याचे रूपांतर मंदीरात केले होते. ही टपरीसुध्दा तातडीने काढण्याच्या सुचना मंडळाला केल्या आहेत. टपरी काढली नाही तर मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही टिके यांनी दिले. कारवाईमुळे छ. शिवाजी महाराज चौक, सुभाषचौक व बाजारपेठेचे प्रवेश्‍व्दार यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.

कायदा मोडल्यास कडक कारवाई
पोलिस ठाण्यात गोळावाले हातगाडीधारक जमा झाले. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक नासीर मुलाणी, युसूफ शेख, कुमार शिंदे आले. त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना पालिकेनेही वेळ ठरवून दिली आहे त्यावेळेतच व्यवसायिक हातगाडे लावत असल्याचे सांगितले. यावर टिके यांनी वीस वर्षांपुर्वी पर्यटकांची संख्या आणि आजची संख्या यामध्ये कमालीचा फरक पडला आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होते. चौकापासून वीस फुट बाजुला जागा दिली आहे, चौकातच व्यवसाय करण्याचा तुम्ही हट्‌ट्‌ धरू नका व कायदा मोडू नका अन्यथा, मला कडक कारवाई करावी लागेल, असे स्पष्टपणे सांगितले. या कारवाईचे शहरातून स्वागत करण्यात होत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)