महाबळेश्‍वरचे पोलीस पाटील आंदोलनात सहभागी होणार

महाबळेश्वर : तहसीलदार यांना निवेदन देताना बाजीराव पार्टे पाटील, नितीन सोंडकर पाटील, मंगेश शिंगरे पाटील, अजय रिंगे पाटील, उत्तम कदम पाटील.

महाबळेश्वर, दि. 27 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याने मुंबई येथे 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाबळेश्वर तालुका पोलीस पाटील संघटना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या संघटनेचे अध्यक्ष बाजीराव पार्टे यांनी याबाबतचे निवेदन महाबळेश्वत पोलीस ठाण्यास दिले. यावेळी विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेने पोलिस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा केला आहे.परंतू शासनाकडून केवळ आश्वासन मिळाल्याने या मागण्याबाबत निर्णय घेण्यास दिरंगाई करीत असल्याच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात येत्या नोव्हेंबर ला पोलिस पाटील संघटनेचा मुंबई येथिल प्रगती मैदानावर धरणे आंदोलन छेडले असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने गाव कामगार पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत. महाबळेश्वर पोलीस पाटील संघटनेनेदेखील या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी सुरु केली आहे. नुकतेच याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाजीराव पार्टे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बालाजी गायकवाड व प्र. नि. नायब तहसिलदार श्रीकांत तिडके यांना देण्यात आले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)