महाबळेश्वर @10.7

पारा कमालीचा घसरला : देशातील दहा सर्वात थंड ठिकाणांमध्ये महाबळेश्वर पाचव्या स्थानवार

सातारा – राज्यात ऑक्‍टोबर हिटची होरपळ वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्राचे चेरापुंजी समजले जाणाऱ्या महाबळेश्वराचा पारा कमालीचा घसरला आहे. महाबळेश्वरचा पारा शुक्रवारी 10.7 सेल्सिअसपर्यंत घसरल्याने कडाक्‍याची थंडी पडली आहे. महाबळेश्वरचे तापमान थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या शिमला या शहरात इतके झाले आहे. गुरुवारी येथील तापमान 11.6 डिग्री सेल्सिअस होते.

-Ads-

गुरुवारी देशातील दहा सर्वात कमी तापमान असलेल्या ठिकाणांची यादी हवामान खात्याने जाहीर केली. यात महाबळेश्वर पाचव्या स्थानवार आहे. बुधवारी महाबळेश्वरमधील तापमान हे 17.2 डिग्री सेल्सिअस होते. तर गुरुवारी हा पारा सहा अंशांनी खाली घसरला आहे. गेल्या दहा वर्षातील हे ऑक्‍टोबर महिन्यातले सर्वात कमी तापमान आहे.

याआधी 1972 मध्ये ऑक्‍टोबर महिन्यात 10 डिग्री सेल्सिअस तापमान झाले होते. तसेच गेल्या काही वर्षात महाबळेश्वरमध्ये ऑक्‍टोबर महिन्यातील तापमान हे 14 ते 15 डिग्री पर्यंतच होते.

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात यावर्षी नेहमीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या वातावरणात आद्रर्ता कमी झाली आहे. महाबळेश्वरमध्ये देखील दिवसा कमी आद्रर्ता व ढगाळ वातावरण असते तर रात्री आकाश निरभ्र असते. त्यामुळे महाबळेश्वरमधील तापमान कमी झाले आहे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)