महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरले

वाढत्या पर्यटकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी 

एक लाखाहुन अधिक पर्यटकांची नोंद

पाचगणी – दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वर, पाचगणीला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रविवारी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी अक्षरश: बहरुन गेली होती. या आठवडाभराच्या सुट्ट्यांमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्‍वरला भेट दिल्याची नोंद झाली आहे.

सध्य दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटनाची आवड असलेले नागरिक विविध ठिकाणी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. विशेष म्हणजे जगाच्या नकाशावर नाव कोरलेल्या महाबळेश्‍वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना राज्यभरासह देशातून तसेच विदेशातूनही पर्यटक भेटी देत असतात. सध्या दिवाळी सुट्ट्यांमुळे तर ही दोन्ही पर्यटन स्थळे अक्षरश: गजबजून गेली आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक यंत्रणेवर जास्त भार आला आहे.

रविवारी पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पाचगणी-महाबळेश्वर या सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने कोंडी झाली होती. त्यामुळे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. यावेळी मर्यादित वाहतूक पोलीस हजारो पर्यटकांवर नियंत्रण ठेवत आहेत. पर्यटकांची वर्दळ आणि वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडकल्याचे दिसून आले. प्रशासनाने नेटके नियोजन करूनही वाहतूक यंत्रणा कोलमडून गेली आहे.

वेण्णालेक, मॅप्रो, मालाज, शेर बाग परिसरात वाहनांची कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत होती. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)