महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

पाचगणी – महाबळेश्वर येथील केट्‌स पॉइंटवर सांगली येथील एका प्रेमी युगुलाने गळफास आत्महत्या केली. याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि. 15) सकाळी अविनाश आनंदा जाधव आणि तेजश्री नलावडे (दोघेही रा. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली) या दोघांनी महाबळेश्वर फिरण्यासाठी वसंत नारायण जाधव (रा. अवकाळी) यांची टॅक्‍सी महाबळेश्वर येथून सकाळी साडे सातवाजता भाड्याने केली. केटस पॉइंट येथे गेल्यावर हे दोघेही पॉइंटवर व शेजारील जंगलात फिरायला गेले. परंतु बराच वेळ झाला तरी, ते दोघे परत येत नाहीत हे लक्षात आल्यावर मित्रांच्या मदतीने ड्रायव्हर जाधव याने आजूबाजूला शोध घेतला. तर, झाडीत काही अंतरावर हे दोघेही झाडाला लटकताना दिसले.

वसंत जाधव यांनी याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिला. पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी दोघेही मृत झाल्याचे समजले. अधिक तपास करता मयत अविनाश जाधव हा सांगली येथील मानसिंग सह बॅंकेत नोकरीला होता. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमी युगलाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात असे नमूद केले आहे की, आम्ही एकमेकाशिवाय सुखी राहिलो नसतो.

तसेच आम्ही दोघेही एकमेकां शिवाय जगू शकलो नसतो. आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आता वाद करू नयेत. भांडणे केली तर, आमच्या आत्म्यास शांती मिळणार नाही.
या घटनेची पाचगणी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याच्या सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. व्ही. सावंत, व्ही. एस .फडतरे, नंदकुमार कुलकर्णी, ए. एस. बाबर, पी. एन.फडतरे, एस. डी. शेळके, भरत जाधव, व्ही. एस. वझे, एस. जी. नेवसे, एम. ए. फुलसुंदर, पी. एस. जगताप व त्यांचे सहकारी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)