महाबळेश्वरमधील पेट्रोलपंपावर पाणीमिश्रीत डिझेल

 डिझेल टाकताच पालिकेचा जेसीबीही पडला बंद
नगराध्यक्षांची तहसिलदारांकडे तक्रार
वाहनधारकांच्या तक्रारींमध्येही वाढ
महाबळेश्वर, दि. 9 (प्रतिनिधी) – महाबळेश्वर येथील भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल पंपावर डिझमध्ये पाणी असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून काहींच्या गाड्या या डिझेलमध्ये असलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत. शनिवारी पालिकेच्या जेसीबीमध्ये डिझेल टाकल्यानंतर डिझेलमध्ये असलेल्या पाण्यामुळे जेसीबीदेखील बंद पडला असल्याचा प्रकार समोर आला. याबातची तक्रार नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी तहसीलदार मीनल कळसकर यांना केली आहे.
महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना मुख्य रस्त्यावर पंचायत समिती समोर भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर गेल्या पंधरा दिवसांपासून डिझेलमध्ये पाणी असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. महाबळेश्वर शहरात दोन पेट्रोलपंप आहेत. एक पेट्रोलपंप बंद आहे तर हा दुसरा भारत पेट्रोलियमचा पेट्रोलपंप असून या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून पाणीमिश्रित डिझेल मिळत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांमधून होऊ लागल्या आहेत. अनेकांच्या गाड्या पाणीमिश्रित डिझेलमुळे बंद पडल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे पाहावयास मिळत असून शनिवारी महाबळेश्वर पालिकेच्या जेसीबीसाठी डिझेल आणण्यात आले होते. मात्र डिझेल टाकल्यानंतर पालिकेचा हा जेसीबी बंद पडला. या तक्रारींमध्ये वारंवार वाढ होत असल्याची तक्रार नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी तहसीलदार मीनल कळसकर यांच्याकडे केली. तहसीलदार मीनल कळसकर यांनी देखील आपण स्वतः लक्ष घालून याबाबत योग्य ती दखल घेऊ असे आश्वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)