महापौर, विरोधी पक्षनेत्यांना डावलले

 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे उभारल्या जाणाऱ्या संतपीठ समिती सदस्यांमध्ये शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर राहुल जाधव तसे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना डावलण्यात आले आहे. त्याऐवजी या संतपीठासाठी प्रयत्न करणारे आणि सध्या बदली होऊन अन्यत्र कार्यरत असलेले महापालिकेचे माजी अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या आशयाचा प्रस्ताव विधी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही लोकप्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संतपीठ समिती सदस्य निवड करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीावण हर्डीकर यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि.27) बैठक आयोजित करण्यात आली होती.संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर कंपनीची स्थापना केली जाणार असून आयुक्त श्रावण हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीमार्फत महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. कंपनीचे सेक्रेटरी सतीश लुंकड हे कंपनी नोंदणीकृत करणे व त्या अनुषंगिक कामकाज पाहणार आहेत.

वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे “संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले “जगतगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येणाऱ्या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्‍टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्चपदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संतपीठाच्या कामासाठी येणाऱ्या 45 कोटीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

…अशी आहे सतिमीची रचना
आयुक्‍त श्रावण हर्डीकर – पदसिद्ध अध्यक्ष
मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे – संचालक
प्राथमिक शिक्षणाधिकारी पराग मुंढे – संचालक
शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे – सदस्य
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे – सदस्य
माजी अतिरिक्त आयुक्‍त तानाजी शिंदे – सदस्य
राजु ढोरे महाराज – सदस्य
स्वाती मुळे – सदस्य
कायदा सल्लागार हेदेखील सदस्य असणार आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)