महापौर वाकळेंच्या तिसऱ्या अपत्याच्या मुद्यावर 8 जानेवारीला सुनावणी

नगर: महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व सुवर्णा जाधव यांचेविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (दि. 8) सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रभाग क्रमांक सहामधील भाजप उमेदवार व विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याविरुद्ध पराभूत शिवसेना उमेदवार अर्जुन बोरूडे यांनी तिसऱ्या अपत्याच्या जन्मदाखल्याबाबत हरकत घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे पराभूत उमेदवार दत्ता गाडळकर व गीतांजली काळे यांनी विजयी शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे व सुवर्णा जाधव यांचेविरुद्ध हरकत घेतली असून यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाडळकर व काळे यांच्यावतीने ऍड. एफ.एस. सय्यद हे न्यायालयात याचिकेवर काम पाहत आहेत. त्यात म्हटले आहे, निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रभागाच्या नकाशात टिळक रोड परिसर हा प्रभाग क्रमांक 13 मध्ये होता. तो प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ठ केला. त्यामुळे या परिसरातील 700 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ठ झाली. त्याचा संबंधित उमेदवाराला फायदा झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर जिल्हा न्यायालयात वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश यांचेसमोर सोमवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी 8 जानेवारी देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. एफ. एस. सय्यद हे काम पहात असून त्यांना ऍड. एस.ए. सय्यद हे सहाय्य करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)