‘महापौर बचत बाजारचे आयोजन करा’

पुणे – महापालिकेने अनुदानातून सुरू केलेल्या शहरातील बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी “महापौर बचत बाजार’चे आयोजन करावे, अशी मागणी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेने दिलेल्या अनुदानातून शहरात सुमारे चार हजार बचत गट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने पालिकेकडून दरवर्षी दिवाळीमध्ये शहराच्या वेगवेगळ्या पाच भागांत ‘महापौर बचत बाजार’ भरविले जातात. मात्र, त्या ठिकाणी केवळ 800 ते 900 बचतगटानांचा जागा मिळते. त्यामुळे वर्षभर अनेकांना आपल्या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळविताना दमछाक होते. तसेच या बचतगटांवर अनेक महिलांची कुटुंबे अवलंबून असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक तीन ते चार महिन्यांत हे बाजार भरविल्यास प्रत्येक बचत गटांना आपले उत्पादन संपूर्ण वर्षभर विक्री करणे सहज शक्‍य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)