महापौर निधी 5 कोटींवरुन 8 कोटी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहराच्या महापौरांना विशेष निधी असावा म्हणून वार्षिक अर्थसंकल्पात महापौर निधीसाठी 3 कोटींची तरतूद केली. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या निधीत प्रत्येक वर्षी वाढ करण्याचा पायंडा पाडला आहे. आगामी अर्थसंकल्पात महापौर निधीत 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे पुढील वर्षात महापौर निधी 5 कोटींवरून 8 कोटी होणार आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी दुरदृष्टी ठेवून महापौरांना विशेष असा निधी असावा म्हणून पालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात 3 कोटी निधीची तरतूद ठेवली. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक महापौर होऊन गेले. त्यांनी 3 कोटी निधींवरच शहरातील नागरिकांची कामे केली. मात्र, दीर्घ काळापासून चालत आलेल्या या परंपरेला छेद देण्याचे काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले महापौर होण्याचा मान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समुहातले नितीन काळजे यांना मिळाला. 2017-18 च्या अर्थसंकल्पात महापौर निधीत 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महापौर निधी 3 कोटींवरून 5 कोटी झाला. मागच्या वर्षी यात वाढ केलेली असताना आता पुन्हा महापौर राहुल जाधव यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पात 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस पालिकेच्या लेखा विभागाला सुचविली आहे. त्यांची शिफारस लागू झाल्यास महापौर निधी 5 कोटींवरून 8 कोटी एवढा होणार आहे.

पुढील वर्षात महापौर निधीत 8 कोटींची वाढ होत असली तरी तो निधी नागरिकांसाठीच खर्च केला जाणार आहे. हा निधी रितसर मार्गाने खर्च केला जाईल. त्यातून लोकांची कामे होतील. म्हणून महापौर निधीत वाढ करण्याची शिफारस केली आहे.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)