महापौर चषक स्पर्धेत “अंगापेक्षा बोंगा जड’

बक्षिसांपेक्षा पंचाचे मानधनच अधिक : खेळाडू उपाशी; संघटना तुपाशी


क्रीडा विभागाला संघटनांची काळजी अधिक

पुणे – शहरातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजित महापौर चषक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंपेक्षा पंचाचे मानधन अधिक असल्याचे समोर आले आहे. तर, संघटनांच्या संयोजनाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट क्रीडा विभागाने घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संयोजनासाठी मंडप, लाईट, ध्वनिक्षेपक, खेळाडूंना जेवण, प्रवास भत्ता पालिकाच देणार असताना क्रीडा संघटनांना लाखो रुपयांचे संयोजन शुल्क दिले जाणार आहे. त्यामुळे क्रीडा विभाग खेळाडूंसाठी काम करतो, की? संघटनांसाठी अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.

या स्पर्धेच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून सोमवारच्या बैठकीत त्यास मान्यता दिली जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून या वर्षी महापौर चषकाअंतर्गत सुमारे 24 स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने क्रीडा संघटनांची बैठक बोलाविली होती. यात झालेल्या चर्चेनुसार ज्या संघटनांना या स्पर्धा संयोजनाचे काम दिले आहे, त्यांना अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ती क्रीडा विभागाने स्थायी समितीसमोर सादर केली असून त्यात चक्क काही स्पर्धांच्या बक्षिसांपेक्षा पंचाचे मानधन अधिक आहे, तर काही स्पर्धांमध्ये बक्षिसांच्या रकमेच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे या स्पर्धा नेमक्‍या कोणासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे, क्रीडा विभागानेही खेळाडूंपेक्षा संघटनांनाच अधिक फायदा होईल, अशा प्रकारे हा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.

क्रीडा प्रकार आणि मानधनाचा आकडा
सॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी खेळाडूंना 60 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तर, पंचांचे मानधन 76 हजार रुपये आहे. अशीच स्थिती स्केटिंग स्पर्धेची आहे. 40 हजारांचे बक्षीस देण्यात येणार असून पंचाचे मानधन 30 हजार रुपये आहे. बास्केटबॉल-60 हजारांची बक्षिसे असून पंचाचे मानधन- 55 हजार रुपये, कब्बडी बक्षीस- 5 लाख 64 हजार असून पंचांचे मानधन 3 लाख रु. शुटिंग बॉल- बक्षीस रक्कम 1 लाख 20 हजार, पंचांचे मानधन 75 हजार रु., तर फुटबॉल-1 लाखांची बक्षीसे असून पंचांचे मानधन 65 हजार रुपये असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मग संयोजन खर्च कसला?
या 4 स्पर्धांसाठी क्रीडा विभागाने 1 कोटी 11 लाख 150 रुपयांचा खर्च येणार असल्याचे म्हटले आहे. त्यात बक्षीस रकमेपोटी 57 लाख 24 हजार रुपये दिले जाणार आहेत असून 15 लाख 3 हजार 500 रुपये पंचांचे मानधन आणि तब्बल 39 लाख 2 हजार 150 रुपये क्रीडा संघटनाना स्पर्धा संयोजन खर्चापोटी दिले जाणार आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यासाठी लागणारा आवश्‍यक खर्च महापालिकेचा क्रीडा विभाग करणार आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, त्यानंतरही आणखी कोणत्या संयोजनासाठी 39 लाख रूपये दिले जाणार, याचा खुलासा प्रस्तावात करण्यात आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)