महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील गैरव्यवहारांची होणार चौकशी

मुख्यमंत्र्यांचे आदेश


विधिमंडळात उपस्थित झाला होता प्रश्‍न

पुणे- महापालिकेच्यावतीने खराडी येथे ऑक्‍टोबर 2016 मध्ये आयोजित केलेल्या पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. तारांकित प्रश्‍नाद्वारे हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

5 ते 9 ऑक्‍टोबर 2016 मध्ये पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये राष्ट्रीय तालिम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये 1 कोटी 26 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आमदार विजय काळे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले असून, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

राष्ट्रीय तालिम संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात या विषयाची कागदपत्रे मिळवली आहेत. त्यांनीच याबाबत तक्रार केली आहे. या कुस्तीस्पर्धेसाठी राबवण्यात आलेल्या कार्यपद्धतीबाबत आणि झालेल्या खर्चाबाबत चौकशी करून त्याचा अहवाल राज्यसरकारला सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त आणि धर्मादाय आयुक्तांना दिल्याचे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)