महापौरांच्या तिसऱ्या अपत्यावर 14 तारखेला सुनावणी

नगर: महापालिका निवडणुकीसंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह तीन नगरसेवकांविरुध्द दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी महापौर वाकळे व इतर तिघांना न्यायालयाने मुदत दिली आहे. पुढील सुनावणी 14 जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जावध यांचे नगरसेवक पद्द करावे, यासंबधांची याचिका पराभूत उमेदवारांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाखल केलेली आहे.

महापौर वाकळे यांना तिसरे अपत्य असल्याने त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी पराभूत शिवसेनेचे उमेदवार अर्जुन बोरुडे यांनी केली आहे. दत्ता गाडळकर यांनी शिंदेविरुध्द याचिका केलेली असून, बीएलओंना हाताशी धरून ही निवडणुक जिंकल्याचे याचिकेत म्हटले आहे. भाजपच्या पराभूत उमेदवार गीतांजली काळे यांनी शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या निवडीवर हरकत घेतली आहे. नीलेश म्हसे यांनी अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमविरुध्द याचिका दाखल केलेली आहे. विजयी उमेदवारांना न्यायालयाने नोटीस काढून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. परंतु मंगळवारच्या सुनावणीत चौघांनी न्यायालयात अर्ज करून म्हणणे मांडण्यास मुदत मागितली होती. न्यायालयाने मुदतवाढ देत 14 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)