महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा – संजोग वाघेरे

पिंपरी – सभा तहकुबीचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे. वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, “ना भय ना भ्रष्टाचार’ अशी वल्गना करुन सत्तेवर आलेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड शहराला मागील सव्वा वर्षात किती निधी दिला. मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होतो. कायदा सुव्यवस्थेचे काय झाले? शहराचे “शांघाय’ करणार होतात त्याचे काय झाले? याचे उत्तर पिंपरी चिंचवडमधील नागरीकांना मिळाले पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकिकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणी वाघेरे पाटील यांनी केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणा-या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरिकांना मिळाली पाहिजेत. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. भाजपच्या काळात 43व्या क्रमांकावर गच्छंती झाली आहे, अशीही टिका वाघेरे पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)