महापुरुष पुतळ्यांच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

लोणावळ्यात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

लोणावळा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती लोणावळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. लोणावळा नगर परिषद नव्याने प्रस्थापित करणाऱ्या महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांभोवती सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते झाले.

सुशोभीकरणासाठी 1 कोटी 2 लाख रुपयांची तरतूद केल्याचे नगर परिषदेचे विद्यमान उप नगराध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांसाठी एक प्रेरणादायी दिवस असल्याचे प्रतिपादन आमदार भेगडे यांनी यावेळी केले. देशातील प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब कळाले पाहिजे, कारण बाबासाहेब हे व्यक्‍ती नसून एक विचार आहे, असे मत खासदार बारणे यांनी व्यक्‍त केले. यावेळी “आरपीआय’ चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मुख्याधिकारी सचिन पवार, नगर परिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका व रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रमत नगरसेवक निखिल कवीश्‍वर यांनी प्रास्ताविक केले.

राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह उन्हातही दिसून आला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. शहरातील सुभाषचंद्र बोस चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती आणि नगरपालिका रुग्णालय आवारातील पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी मानवंदना झली. यानंतर शहरातील विविध भागात बुद्ध विहारांमध्ये कार्यक्रम झाले. सकाळी अकरानंतर लोणावळा शहर आणि परिसरातील मिरवणुकांना प्रारंभ झाला. शहरातील तापमान उच्चांक गाठणारे असतानाही उन्हात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये शहरातील आबाल-वृद्ध सहभागी झाले होते.

रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगरसेवक दिलीप दामोदरे, शहराध्यक्ष कामलशील म्हस्के, जयंती मोहत्सव अध्यक्ष दीपक भालेराव यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. लोणावळा शहरातील सिद्धार्थ नगर, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, हनुमान टेकडी, खंडाळा, आगवाली चाळ, भुशी, रामनगर व परिसरातील कुसगाव, वाकसई, कुरवंडे या ग्रामीण परिसरातून मिरवणुका घेऊन आलेल्या भीमसैनिकांसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून पाण्याची तसेच अल्पोपहाराची सोय केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)