महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करा

जामखेड – संपूर्ण संविधानाचे विश्‍लेषण आपल्या शाहीरीतून करत असताना अनेकांची मने जिंकली. संविधान जागृती गीताबरोबर समाजातील अनिष्ट रूढी शिक्षणाचा अभाव, वाढती बेकारी, व्यसनाधीनता व्हॉट्‌ऍपचा वाढता गैरवापर आदी विषयांचे दुष्परिणाम सांगून महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिप्रित असणारा समाज निर्माण करण्याचे आवाहन भीमशाहीर प्रा. जयभिम शिंदे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृतीच्या उद्देशाने संविधान महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या संविधान महोत्सवाचे माजी जि. प. सदस्य मधुकर राळेभात, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, माजी मंडलाधिकारी मुरलीधर सदाफुले, प्रा. विक्री घायतडक, बौध्दाचार्य महेंद्र घायतडक, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.
संविधान महोत्सव सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, तालुक्‍यातील भीमसैनिकांचे वतीने आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाचे पाचवे वर्ष आहे. तालुक्‍यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सन्मान चिन्ह देवून गौरव केला. संजय कोठारी (अपघातग्रस्तांना मदत), अरूण जाधव (महाराष्ट्र फाउंडेशन), निळकंठ घायतडक (शैक्षणिक सामाजिक) आदींचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)