महापालिकेला स्वीडनच्या शिष्टमंडळाची भेट

पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये स्वीडनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्वीडन त्या भारतातील कन्सुलेट जनरल श्रीमती उर्लिका संडबर्ग यांनी सांगितले. स्वीडनच्या पथकाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गुरुवारी (दि.21) भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका भवनात आलेल्या या शिष्टमंडळाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत केले. त्यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्वीडनच्या शिष्टमंडळातील लीव डलबर्ग, न सॉफी, डेवीस, विली सिबीया, क्‍लास वाहलबर्ग, जेनिफर क्‍लार्क, जोहान हेमिंगसन, रूपाली देशमुख आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर विकसित करण्यात येणार असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी सांगितले. शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वीडन ने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याशिवाय केंद्र सरकारने स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवड चा समावेश केला असून येत्या दोन वर्षांत त्याचे काम दृष्टीपथात येईल अशी माहिती हर्डीकर यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)