महापालिकेलाही अंधश्रध्देची लागण ?

अमावस्ये मुळे बंद जलवाहीनीतून सोडले नाही पाणी

पुणे : एका बाजूला विज्ञानाच्या जोरावर माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या पुणे महापालिकेला अंधश्रध्देची लागण झाली आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्रा पर्यंत बंद जलवाहीनी शुक्रवारी सुरू करण्यात येणार होती. मात्र, कार्तिकी अमावस्या असल्याचे कारण पुढे करत ही जलवाहीनी उद्या (शनिवारी) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-

महापालिकेकडून पर्वती ते लष्कर जलकेंद्रा पर्यंत तब्बल 100 कोटी रूपये खर्चून बंद जलवाहीनी टाकण्यात आली आहे. या जलवाहीनीमुळे महापालिकेस आता खडकवासला मुठा उजव्या कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी पाणी घ्यावे लागणार नाही. त्यामुळे दरदिवशी सुमारे 100 ते 150 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.

या शिवाय, या जलवाहीनीचे काम पूर्ण झाल्याने सुमारे दिडशें वर्ष जुन्या लष्कर जलकेंद्राची क्षमताही महापालिकेस वाढविण्यासाठीच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. या जलवाहीनीची चाचणी सोमवारी ( 3 डिसेंबर) रोजी यशस्वीरित्या घेण्यात आली. त्यानंतर आज या केंद्रासाठी स्वतंत्र वीज यंत्रणा पर्वती जलकेंद्रात जोडण्यात येणार होती. या कामासाठी शुक्रवारी सर्व शहराचा पाणी पुरवठा बंदही ठेवण्यात आला.

शुक्रवारी सांयकाळी हे वीज जोडणीचे काम संपताच; या जलावाहीनी मधून लष्कर जलकेंद्रासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, रात्री आठच्या सुमारास पाणी सोडले जाणार होते. मात्र, काही कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यात आज अमावस्या असल्याची सुपीक बाब आली आणि त्यांनी अमावस्येला पाणी सोडल्यास भविष्यात काही अडचणी येण्याची भिती व्यक्त केली. त्याचेच निमित्त पुढे करत मग पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, पाणी अमावस्येमुळे सोडण्यात आले नसल्याबाबत सांगण्यास अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला. त्यामुळे आता महापालिकेच्या डोक्‍यावर बसलेले अंधश्रध्देचे हे भूत कोण उतरविणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)