महापालिकेत 149 कोटी मिळकत कराचा भरणा

पिंपरी – महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे यंदाच्या आर्थिक वर्षात 28 जूनअखेर 149 कोटींचा भरणा झाला आहे. शहरातील 1 लाख 47 हजार 603 मिळकतधारकांनी ही रक्कम भरली आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीच्या काळात 81 हजार 69 मिळकतधारकांनी “कॅशलेस’ सुविधेचा वापर करून 86 कोटी 34 लाखांचा भरणा केला आहे. या कर भरणामध्ये 4 हजार 877 महिला मिळकतधारकांनी 2 कोटी 84 लाख रुपये, 378 दिव्यांग मिळकतधारकांनी 22 लाख रुपये, 1 हजार 510 माजी सैनिकांनी 78 लाख रुपये, तर 49 हजार, 325 निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांनी पाच व दहा टक्के सवलतीचा लाभ घेत 34 कोटी 50 लाखांचा भरणा केला आहे. दरम्यान, उद्या (दि. 30) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळकत कराचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना सामान्य करात पाच ते 50 टक्के सवलत मिळणार आहे. याचा मिळकतधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकल विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)