पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित आक्षेपाधीन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॉर्ड तपासणीसाठी मुख्य लेखापरीक्षण विभागाने 1 जूनपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर यांनी दिली.
महापालिकेच्या विविध विभागाचे प्रलंबित आक्षेपाधीन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॉर्ड तपासणीकामी उपलब्ध झालेले नाही. त्या आक्षेपाधीन रक्कमांचे अनुषंगाने विविध विभागातील उपलब्ध रेकॉर्डची तपासणी होणार आहे. त्या विभागात प्रत्यक्ष जावून मुख्य लेखापरीक्षण विभागाचे लेखापरीक्षक तपासणीचे कामकाज करणार आहेत.
त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी आक्षेपाधिन रकमांचे रेकॉर्ड तपासणीसाठी विभागात डी.ओ.सी. नुसार तयार ठेवावे, उपलब्ध रेकॉर्ड प्रत्यक्ष तपासणीचे कामकाज पुर्ण करुन आक्षेपित बाबींचे तपशील अहवालाद्वारे आक्षेप विभागांना कळविण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष तपासणीकामी उपलब्ध झालेले रेकॉर्ड मुळ आक्षेपाधिन रकमेमधून कमी करता येईल, असेही तळदेकर यांनी लेखी आदेशात म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा