महापालिकेत युती झाली नाही तर स्वबळावर – खा. दानवे

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणाबरोबर अन्य कारणे
नगर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही. नगरच्या महापालिका निवडणुकीत समविचार पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे. परंतू त्यांना युती मान्य नसले तर भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
खा. दानवे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्याच्या कोअर समितीची बैठक झाली. त्या बैठकीला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर खा. दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहरात गटतट राहिले नाही. महापालिका भाजपच्या ताब्यात आणणे हे एकमेव उद्दिष्टे आहे. त्यामुळे सर्व एकत्रिपणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आज भाजपच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येत आहेत. त्याचा भाजपवर काहीच परिणाम होणार नाही. 2014 मध्ये देखील हे सर्व पक्ष भाजपच्या विरोधात होते. तरी भाजपची सत्ता आली, आताही त्याचा काहीच परिणाम होणार आहे. कारण भाजप हा पक्ष संघटनेवर विश्‍वास ठेवतो. आणि पक्ष संघटना मजबूत झाली आहे. आज बुथ कमिट्या स्थापन झाल्या असून एक बुथ 25 युवक या प्रमाणे नियोजन झाले आहे. राज्याज 91 हजार 400 बुथ असून त्यापैकी 43 हजार बुथवर समित्या स्थापन झाल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत जे भाजपबरोबर होते त्यांना बरोबर घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सध्या तरी हे सर्व पक्ष एनडीएमध्ये असल्याचे सांगून खा. दानवे म्हणाले की, पक्ष संघटना देशात मजबुत करण्यात आली आहे. त्यामुळे नशिबावर आम्ही चालणार नाही. तर पक्ष संघटनेच्या जोरावर पुन्हा देशात पक्षाची सत्ता येणार असल्याचे ते म्हणाले.
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत विरोधक टिका करीत आहे. परंतू जनता भाजपबरोबर आहे. पक्ष काम करतो की नाही. तो जनतेचे भले करतो की नाही. याचे मुल्यमापन निवडणुकीतून होते. गेल्या चार वर्षात झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. 15 महापालिका व 10 जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहेत. जनता भाजपला निवडून देत आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला काहीच महत्व नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होत नाही. तर त्याला अन्य कारणे देखील आहे. आज कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. निवडणुका जवळ आल्याने त्यांना व्यासपीठ हवे म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा काहीच परिणाम भाजपवर होणार नाही. असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)