महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे – प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने मनपा प्रांगणात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यापूर्वी आवारात असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ध्वजवंदनानंतर मनपाच्या सुरक्षा व अग्निशमन दलाने संचलन व मानवंदना दिली. महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी मानवंदना स्वीकारली. त्यांचेसमवेत अतिरिक्त मनपा आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शीतक उगले, स्मार्ट सिटी चे सीईओ राजेंद्र जगताप व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)