महापालिकेत प्रशासकीय खांदेपालट

पुणे – पुणे महापालिकेच्या उपायुक्तांच्या रिक्त पदांवर तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच विद्यमान उपायुक्तांकडील अतिरिक्त पदभार अन्य आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. चांदणी चौक उड्डाणपूल, शिवसृष्टी, बीडीपी तसेच अन्य महत्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन विभागाचाही यामध्ये समावेश आहे.

उपायुक्त सुनील केसरी आणि संध्या घागरे हे दि. 31 ऑक्‍टोबरला सेवानिवृत्त झाल्यानंतर पदोन्नतीचा निर्णय घेतानाच अन्य विभागांतही बदल करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांच्याकडे असलेला भूसंपादन व्यवस्थापन विभागाचा पदभार राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेले समाज कल्याण विभागाचे उपायुक्त संतोष भोर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच घनकचरा विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्याकडे केवळ याच विभागाची संपुर्णत: जबाबदारी ठेवून त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर कार्यालयाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपायुक्तपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये सुनील गायकवाड, जयंत भोसेकर आणि नितीन उदास या सहायक आयुक्तांचा समावेश आहे. गायकवाड यांच्याकडे तांत्रिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून भोसेकर यांची परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन उदास यांच्याकडे स्थानीक संस्था कर आणि समाज कल्याण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. हे तिघेही अनुक्रमे नगररोड, कोथरूड -बावधन आणि कोंढवा -येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयात क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम पाहात होते. त्यांच्या जागेवर अनुक्रमे कार्यकारी अभियंता राजेश बनकर, रविंद्र ढवळे आणि रविंद्र घोरपडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)