महापालिकेतील रिक्त जागा भरतीला मंजुरी

पुणे – राज्य शासनाने आता महापालिकांमधील रिक्त असलेल्या शिक्षक भरतीला संमती दिल्याने महापालिकेत भविष्यात 636 शिक्षकांची वेगवेगळ्या माध्यमासाठी भरती होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापालिकांमधील शिक्षक भरती 2012 पासून बंद होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेतील पटसंख्या वाढूनही शिक्षक भरती केली जाऊ शकत नव्हती. शासनाने विकसित केलेल्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीला संमती दिली आहे. त्यामुळे पटसंख्येनुसार भविष्यात महापालिकेत शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महापालिकेत विविध माध्यमांची एकूण 636 पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक 275, उर्दू माध्यम 76, इंग्रजी माध्यम 280, कन्नड माध्यमाचे पाच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने मराठा आरक्षणासह यादी तयार केली आहे. या यादीची तपासणी करण्यासाठी ती राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षक भरती केली जाणार आहे.

पवित्र पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अशाच उमेदवारांना भविष्यात पवित्र पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज करता येईल. गुणवत्ता क्रमानुसार त्या उमेदवारांची पदभरती केली जाऊ शकते. यामुळे आता महापालिकेतील सर्व शाळांमधील रिक्त असलेली पदे लवकरच भरती केली जाऊ शकतात. येत्या दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)