विधी समितीची मान्यता : सभापती माधुरी कुलकर्णी यांची माहिती

पिंपरी। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील जूने, निरुपयोगी साहित्य फेरवापरास अयोग्य आहे. पालिका प्रशासनाने सुमारे दीड कोटी अशी रक्कम निर्धारित केली आहे. त्या भंगार साहित्याची विक्री चालू बाजार भावानुसार काढून भंगार साहित्याचे एकूण अंदाजित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देणाऱ्या ठेकेदारास थेट पद्घतीने भंगार साहित्याची विक्री करण्यास विधी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती विधी समिती सभापती माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी यांनी दिली.
महापालिकेच्या विधी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळा हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समिती सदस्य सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे, निकिता कदम, मनिषा पवार, उषा ढोरे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडे जुने, निरुपयोगी भंगार पडून आहे. सुमारे दीड कोटीचे भंगार निरुपयोगी झाले असून ते फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिकेने या भंगाराचा लिलाव करण्याचे ठरविले होते. महापालिकेच्या नेहरुनगर आणि इतर ठिकाणच्या गोडाऊनातील विनावापराचे सुमारे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्‍यक आहे. याकरिता हा ठराव विधी समितीने उपसुचना देवून मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)