महापालिकेतील “ती’ निविदा रद्द करा!

– खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढा-यांनी व ठेकेदारांनी 425 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. 425 कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे 70 ते 90 कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जागा ताब्यात नसतानाही कामाच्या वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी या अगोदर 425 कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा त्वरित रद्द कराव्यात. तसेच नव्याने निविदा मागविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

-Ads-

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्र दिले आहे. त्यात आढळराव यांनी म्हटले आहे की, 425 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. 425 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे खासदारांच्या बैठकीत निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. पत्र देखील दिले होते. त्यामुळे आपण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश द्याल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नसल्याने पालिकेतील सत्ताधारी आणि आयुक्तांनी वर्क ऑर्डर (कार्यरंभ आदेश) देण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे समजते. रस्ते विकासाच्या निविदा काढलेल्या अनेक जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत.

आर्थिक तरतूद नसतानाही निविदा…
तसेच 425 कोटी रुपयांची चालू वर्षात आर्थिक तरतूद नसताना पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये करावयाच्या खर्चाच्या निविदा आता चालू आर्थिक वर्षात काढण्यात आल्या आहेत. सध्याच्या स्थायी समितीची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. त्यामुळे घाईघाईने सर्व आर्थिक व्यवहार पुर्ण करण्यासाठी जलद गतीने निवीदा प्रक्रिया राबविली जात आहे. पालिकेत सत्तेवर भाजप असली तरी त्यांच्या आडून राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या नगरसवेकांनी महापालिकेला लुटण्याची पूर्वीची परंपरा कायम ठेवल्याची भावना जनतेकडून व्यक्त होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)