महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा “एल्गार’

पिंपरी – महापालिका सेवेत मानधन व कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ठेकेदारामार्फत होणारी पिळवणूक थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. येत्या 15 डिसेंबर रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेळावा घेत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

थेरगाव गावठाणातील कैलास मंगल कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता हा मेळावा होईल. महापालिकेतील आरोग्य, विद्युत, सुरक्षा, शिक्षण मंडळ, क्रीडा, क्षेत्रीय कार्यालये, मुख्य कार्यालय, वायसीएम रुग्णालय व इतर सर्व विभागात मानधन व कंत्राटी पद्धतीने सुमारे चार हजार हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.

-Ads-

ठेकेदारामार्फत मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुरू असलेली आर्थिक पिळवणूक सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रमुख मागणीसह महापलिका सेवेतील मानधन व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान काम, समान वेतन मिळावे. कायम कामगारांप्रमाणे गणवेश व इतर साधने मिळावीत. आठ तास काम, साप्ताहिक सुट्टी व वैद्यकीय रजा मिळावी. भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम नियमितपणे शासनाकडे जमा करावी. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व वैद्यकीय सेवा मिळावी आदी मागण्या मेळाव्याच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे झिंजुर्डे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)