महापालिकेतर्फे योगा एशियन चॅम्पीयनशीपच्या विजेत्यांना सात लाखांचे अर्थ सहाय्य

पिंपरी  – सिंगापोरमध्ये 2017 मध्ये झालेल्या सातव्या योगा एशियन स्पोर्टस चॅम्पीयनशीप स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेतर्फे सात लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतीक समिती समोर ठेवण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूस दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या नुपुर लक्ष्मण मोरे, रुपाली गणेश तरवडे, चंद्रकांत श्रीरंग पांगारे यांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर 26 व्या जागतिक योगासन स्पर्धा 2018 मध्ये सहभागी झाल्या बद्‌द्‌ल देवदत्त वसंत भारदे 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र सभा तहकूब झाल्याने हा विषय प्रलंबीत राहिला. समितीची सभा 14 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शहरातील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व त्यांना खेळाची तयारी करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत या हेतूने व समितीच्या धोरणानुसार विजेत्या खेळांडूंना ही आर्थिक मदत करण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)