महापालिकेतर्फे बाल चित्रपट महोत्सव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका व फोर्ब्ज मार्शल कंपनी यांच्या वतीन येत्या 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फोर्ब्स मार्शलच्या सीएसआर हेड विना जोशी, मेलिंडा गायकवाड, महापालिकेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.

-Ads-

महापालिकेकडून 14 नोव्हेंबरला बाल दिन साजरा करण्यात येतो. मात्र, दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा सुरू झाल्यानंतर 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान बाल दिन साजरा करत हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रपटाकडे पाहण्याची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. चिंचवड येथील कार्निवल सिनेमा, सायन्स पार्क व भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात हा महोत्सव होणार आहे.

चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन फिल्म सोसायटी यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, स्पॅनिश व इतर भाषांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेच्या लघु चित्रपटांचा समावेश असणार आहे. याच बरोबर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिनेमा शाळा व “व्हिज्युअल इफेक्‍ट फिल्म’ वरया कार्यशाळा घेण्यात येणार आहे. महोत्सवातील चित्रपट दिवसातून सहावेळा दाखविण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असणार आहे. मात्र त्यासाठी फोर्ब्स मार्शल कंपनींच्या कासारवाडी येथील कम्युनिटी सेंटर येथे 020-39858605 या क्रमांकावर नोंदणी करणे आवश्‍यक असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)